शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

थंडीचा कडाका वाढला; वाशिम हरविले धुक्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 14:19 IST

डिसेंबर महिन्यात पाहिजे तशी थंडी नव्हती, मात्र गत ५ ते ६ दिवसांपासून शहर व परिसरात थंडीचा चांगलाच जोर वाढला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : उत्तर भारतातील थंड वाऱ्यामुळे राज्यातही थंडीचा कडाका वाढला असून वाशिमचा पारा घसरला आहे. थंडीसोबतच रात्री व पहाटे धुके पडत असल्याने शहर व परिसरातील रस्ते धुक्यात हरविल्यासा आभास होत आहे. यामुळे वाहनधारकांना दिवस उजाडल्यानंतरही दिवे लावून वाहने चालविण्याची वेळ आली आहे.डिसेंबर महिन्यात पाहिजे तशी थंडी नव्हती, मात्र गत ५ ते ६ दिवसांपासून शहर व परिसरात थंडीचा चांगलाच जोर वाढला. तापमानात घट होऊन थंडीचा जोर कायम असून गुरुवारी रात्री ९.३० वाजतापासूनच संपूर्ण शहर धुक्यात गडप झालेले दिसून आले. १०० मिटर अंतरावरीलही या धुक्यामुळे काही दिसेनासे झाले होते. थंडीचा कडाका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकासाठी हे वातावरण फायदेशीर ठरणार असल्याचे जाणकार बोलत असले तरी धुक्याचा पिकांवर परिणाम होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. गत ५ ते ६ दिवसांपासून वातावरणात परिणामकारक बदल झाला असून दिवसागणिक वाढत चालेली थंडी, सकाळ व सायंकाळच्या सुमारास पडत असलेले धुके आणि ढगाळी वातावरणामुळे गहू, हरभरा, कपाशी या पिकांसोबतच भाजीपालावर्गीय पिकांनाही जबर फटका बसत आहे. यामुळे नुकसान होत असून शेतकरी मेटाकुटीस आले.वाशिम परिसरात दिवसागणिक थंडीचे प्रमाण वाढतच चालले आहे. याशिवाय ढगाळी वातावरण कायम असून अधूनमधून तुरळक स्वरूपात पावसाच्या सरीही कोसळत आहेत. यामुळे प्रामुख्याने गहू, हरभरा, गहू, कपाशी, कांदा आणि भाजीपाला पिकांना फटका बसत आहे. प्रतिकुल हवामानामुळे तुरीचे बहरलेले पीक सुकत असून हरभरा पिकावर जळ व मररोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. कांदा आणि भाजीपाला पिकावरही करपा व मर रोग ओढवला आहे. हायब्रीड ज्वारी आणि मका पिकावरही यावर्षी अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. एकूणच या सर्व विपरित परिस्थितीमुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.शहरात पडलेल्या धुक्यांचा आनंद नागरिक घेताना दिसून येत आहेत.  मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनी घेतला धुक्याचा आनंदवाशिम शहरातून दररोज शेकडो नागरिक मॉर्निंग वॉकसाठी विविध भागात फिरतांना दिसून येतात. धुके पडल्याने नागरिकांची संख्या कमी होईल असे चित्र असतांना दररोजपेक्षा यामध्ये मात्र गर्दी दिसून आली. संपूर्ण शरीर गरम कपडयांनी झाकून नागरिकांनी मॉर्निग वॉकला येऊन पडलेल्या धुक्याचा आनंद घेतला. अनेकांनी तर असे धुके शहरात प्रथमच पडल्याचे सांगितले.

टॅग्स :washimवाशिमweatherहवामान