स्वच्छतेसाठी घंटागाड्या

By Admin | Updated: October 22, 2014 00:21 IST2014-10-22T00:21:57+5:302014-10-22T00:21:57+5:30

स्वच्छतेसाठी रिसोडात ५ घंटागाड्या.

Clutter for cleanliness | स्वच्छतेसाठी घंटागाड्या

स्वच्छतेसाठी घंटागाड्या

रिसोड (वाशिम) : शहर स्वच्छतेसाठी रिसोड शहरात ५ घंटागाड्या दाखल झाल्या आहेत. नगर परिषदेचे मुख्याधिकारी दिपक इंगोले यांनी हिरवी झेंडी दाखवून शहरातील विविध प्रभागामध्ये घंटागाड्या पाठविल्या आहेत.
रिसोड शहरातील अनेक प्रभागामध्ये घाणीचे व कचर्‍याचे साम्राज्य पसरलेले होते. परिणामी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शहर स्वच्छतेसाठी घंटागाड्या सुरु करण्याची मागणी वारंवार करण्यात आली होती. मुख्याधिकारी इंगोले यांनी घंटागाड्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला. शहर स्वच्छतेसाठी घंटागाडीचे महत्त्व पटवून दिले. इंगोले यांनी केलेल्या पाठपुरावाची दखल वरिष्ठ दरबारात घेण्यात आल्याने रिसोड शहरात पाच घंटागाड्या दाखल झाल्या आहेत. शहरातील विविध प्रभागात सकाळीच केरकचरा उचलण्यासाठी घंटागाडी जात आहे. ओला व सुका कचरा या घंटागाडीमध्ये उचलून कचर्‍याचे व्यवस्थापन केले जात आहे. शहरवासीयांनी घरातील कचरा घंटागाडीमध्ये टाकावा व स्वच्छतेसाठी नगर पालिका प्रशासनाला सहकार्य करावे अशी साद मुख्याधिकारी दिपक इंगोले यांनी शहरवासीयांना घातली आहे.

Web Title: Clutter for cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.