पाणी पुरवठा योजना बंद; विहिरीही आटल्या!
By Admin | Updated: April 30, 2017 19:21 IST2017-04-30T19:21:25+5:302017-04-30T19:21:25+5:30
शिरपूर जैन (वाशिम ) : जानेवारीपासून ग्रामपंचायतची पाणी पुरवठा योजना बंद असतानाच, पाणी पुरवठ्याची विहिर आटत चालल्याने मालेगाव तालुक्यातील ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे.

पाणी पुरवठा योजना बंद; विहिरीही आटल्या!
पाण्यासाठी महिलांची पायपीट
शिरपूर जैन (वाशिम ) : जानेवारीपासून ग्रामपंचायतची पाणी पुरवठा योजना बंद असतानाच पाणी पुरवठ्याची विहिर आटत चालल्याने पाण्यासाठी मालेगाव तालुक्यातील किन्ही घोडमोड येथे ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. महिला मंडळी जीव धोक्यात घालून ग्रामपंचायतच्या विहिरीवर पाणी भरताना दिसत आहेत.
मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर-किन्ही घोडमोड गटग्रामपंचायतमधील किन्ही घोडमोड हे चौदाशे लोकसंख्येचे गाव आहे. या गावात ग्रामपंचायतच्यावतीने विहिरीवरून गावकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यात येतो; परंतु जानेवारीपासून ही योजना बंद आहे. त्यातच या योजनेची विहिरही आटत चालली आहे. त्यामुळे गावकरी, महिलांना गावाबाहेरू न पाणी आणावे लागते. महिला किलोमीटर अंतरावरून डोक्यावर घागरीने पाणी आणतात, तर काही ग्रामस्थ बैलगाडीत टँकर बसवून पाणी भरताना दिसतात. रखरखत्या उन्हात पाण्यासाठी होत असलेली महिलांची केविलवाणी परिस्थिती पाहणेही कठीण आहे.