बंद असलेले जाॅब कार्ड होणार कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:43 IST2021-09-11T04:43:01+5:302021-09-11T04:43:01+5:30

............ प्रभाग रचनेकडे लागले लक्ष वाशिम : आगामी काही महिन्यात मुदत संपणाऱ्या वाशिम नगर परिषद प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा ...

Closed job cards will be activated | बंद असलेले जाॅब कार्ड होणार कार्यान्वित

बंद असलेले जाॅब कार्ड होणार कार्यान्वित

............

प्रभाग रचनेकडे लागले लक्ष

वाशिम : आगामी काही महिन्यात मुदत संपणाऱ्या वाशिम नगर परिषद प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे नगर परिषद निवडणूक पूर्वतयारीला गती मिळणार असून निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांचे प्रभाग रचना प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.

..............

शहर स्वच्छतेकडे पालिकेचे लक्ष

वाशिम : शहरातील विविध भागात दैनंदिन सकाळच्या सुमारास घरोघरी धडकून घंटागाडीद्वारे ओला व सुका कचरा संकलित केला जात आहे. या माध्यमातून स्थानिक नगर परिषदेने शहर स्वच्छतेकडे विशेष लक्ष पुरविणे सुरू केले आहे. या उपक्रमाप्रती नागरिकांतून पालिकेचे काैतुक होत आहे.

..............

जुने शहरातील रस्त्यांची दुरवस्था

वाशिम : जिल्हा मुख्यालय असलेल्या वाशिममधील जुने शहरातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून वाहनचालकांची गैरसोय होत आहे. स्थानिक नगर पालिकेने या समस्येकडे लक्ष पुरवून रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

...........

मंदिरे दर्शनासाठी खुली करण्याची मागणी

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट आता बहुतांशी निवळलेले आहे. यामुळे कित्येक महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे दर्शनासाठी खुली करावी. धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांवरील निर्बंध हटवावे, अशी मागणी राम पाटील यांनी शनिवारी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.

...........

वाहनचालकांचे नियमांबाबत उद्बोधन

वाशिम : शहरातील पुसद नाक्यावर पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचा शनिवारी चांगलाच समाचार घेतला. दुपारच्या सुमारास अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यासह नियमांबाबत त्यांचे उद्बोधनही करण्यात आल्याचे पाहावयास मिळाले.

Web Title: Closed job cards will be activated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.