स्वच्छता शपथ कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 19:57 IST2017-10-10T19:56:43+5:302017-10-10T19:57:32+5:30
वाशिम : ग्राम खरोळा येथे नुकतीच समुदाय संघटन अंतर्गत स्वच्छता पंधरवाडा निमित्त स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम, येथील एम.एस.डब्ल्यु. भाग २ च्या विद्यार्थ्यांना क्षेत्रकार्या अनुषंगाने क्षेत्रकार्य मार्गदर्शक प्रा.एस.एन.शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

स्वच्छता शपथ कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ग्राम खरोळा येथे नुकतीच समुदाय संघटन अंतर्गत स्वच्छता पंधरवाडा निमित्त स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम, येथील एम.एस.डब्ल्यु. भाग २ च्या विद्यार्थ्यांना क्षेत्रकार्या अनुषंगाने क्षेत्रकार्य मार्गदर्शक प्रा.एस.एन.शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोज कोठारी तर प्रमुख वक्ते म्हणुन आर.के.सरतापे, महादेव भोयर, विकास मोरे, संजय नवघरे, अमित घुले, संतोष बोरकर, प्रमुख अतिथी म्हणुन श्रीमती यशोदाबाई ठाकरे सरपंच, प्रकाश ठाकरे उपसरपंच, किसन निकम मा.सभापती पं.स, रामदास बोरचाटे, मदन इंगळे मुख्याध्यापक, महाले, त्याबरोबर प्राचार्य यु.एस.जमधाडे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.ए.पी.राऊत, प्रा.ए.टी.वाघ प्रा.बनकर, इत्यादी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी व ८ वा रॅलीला हिरवी झेंडी दाखवुन सुरुवात केली. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गानी ही रॅली मार्गक्रमण करीत होती. तसेच गावातील मुख्य चौकात, शेतकरी आत्महत्या, स्वच्छता, हागणदारी , पाणी, व्यवस्थापन या विषयावरील पथनाट्य विद्यार्थ्यांनी सादर केली. जि.प.प्राथमिक शाळेतुन सुरु झालेली रॅलीचा शेवट शाळेत करतांना प्रा.एस.एन.शिंदे, यांनी समुदाय संघटना अंतर्गत झालेल्या व घेण्यात येणाºया कार्यक्रमावर प्रकाश टाकुन सहकार्याचे आवाहन केले.त्यानंतर प्रमुख वक्ते राजु सरतापे यांनी गावकºयांना स्वच्छतेचे महत्व पटवुन देवुन शौचालय बांधुन त्याचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले तसेच एम.एस.डब्ल्यु. भाग २ च्या विद्यार्थ्यांनी शेतकरी आत्महत्या या विषयावरील नाटीका सादर केली आणि स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
या रॅलीकरिता संस्थेचे अध्यक्ष कोठारी, प्राचार्य जमधाडे, रासेयोचे पथक जि.प.शाळा मु.अ.मदन इंगळे, महाले, तसेच समस्त गावकरी मंडळीने मोलाचे सहकार्य केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मिशन सोशल वर्क ग्रुप १ च्या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश तडस यांनी तर आभार वैशाली शिंदे यांनी मानले.