इंझोरीतील शाळांची साफसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:23 IST2021-02-05T09:23:57+5:302021-02-05T09:23:57+5:30
---------------- मोहगव्हाण येथे एकाला कोरोना संसर्ग इंझोरी : मानोरा तालुक्यातील ग्रामीण भागांत कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. यात ...

इंझोरीतील शाळांची साफसफाई
----------------
मोहगव्हाण येथे एकाला कोरोना संसर्ग
इंझोरी : मानोरा तालुक्यातील ग्रामीण भागांत कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. यात मोहगव्हाण येथील एका व्यक्तीला कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले आहे. आरोग्य विभागाकडून सोमवारी प्राप्त अहवालानुसार हे स्पष्ट झाले असून, गावातील लोकांना खबरदारी घेण्याच्या सूचना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
----------------
तलाव दुरुस्तीसाठी प्रशासनाला निवेदन
इंझोरी : येथून जवळच असलेल्या जामदरा घोटी येथील सिंचन तलाव लिकेजमुळे कोरडा पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांची रबी पिके संकटात सापडली असून, पुढील वर्षी ही समस्या उद्भवून पुन्हा अडचणी येऊ नयेत, यासाठी या तलावावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी जि.प. जलसंधारण विभागाला निवेदन सादर करून दुरुस्तीची मागणी केली.
-----------------
आधार नोंदणी केंद्राची मागणी
इंझोरी : परिसरातील अनेक शेतकरी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची आधार नोंदणी प्रलंबित असून, परिसरात एकमेव आधार नोंदणी केंद्र देण्यात आले आहे. या केंद्रावर तांत्रिक अडचणीमुळे आधार नोंदणीत अडथळे येत आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी अतिरिक्त आधार केंद्र सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी सोमवारी केली.