स्वच्छ भारत मिशनचा ‘आढावा’
By Admin | Updated: April 12, 2017 13:32 IST2017-04-12T13:32:02+5:302017-04-12T13:32:02+5:30
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आढावा बैठक घेऊन शहर स्वच्छ व हगणदरीमुक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना दिल्या.

स्वच्छ भारत मिशनचा ‘आढावा’
मंगरुळपीर : शहरातील स्वच्छता अभियानाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आढावा बैठक घेऊन शहर स्वच्छ व हगणदरीमुक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना दिल्या.
नगर पालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहूल व्दिवेदी तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी सुनिल कोरडे, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, मुख्याधिकारी दीपक मोरे, नगराध्यक्ष डॉ.गझाला मारुफ खान, उपाध्यक्ष इंदुमती लुंंगे, माजी नगराध्यक्ष चंदु परळीकर आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी व्दिवेदी म्हणाले की, नगर पालिकाच्यावतीने १६ आॅगस्ट २०१६ पासून स्वच्छ भारत मिशन अभियानला सुरुवात झाली आहे. या अभियानाचे उद्दिष्ट पुर्ण व्हावे यासाठी कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. याशिवाय शहरातील सार्वजनिक शौचालयाची कामे पूर्णत्वास जात आहे. हे सर्व कामकाज करीत असतांना अडचणी येतात, मात्र न डगमगता अडचणीवर मात करुन उद्दिष्ट साध्य करावे, असे आवाहन केले. या बैठकीत नगरसेवक अॅड.मारुफ खान, नगरसेवक प्रा.विरेंद्रसिंह ठाकुर, मो.अफसर, आकाश संगत, लईक अहेमद, उबेद बेग, अनिलभाऊ गावंडे, आदि उपस्थित होते. संचालन प्रशासन अधिकारी डी.एस.बन्सोड यांनी तर आभार वाहाब खान यांनी मानले.