फटाके फोडण्यावरून दोन गटांत हाणामारी

By Admin | Updated: November 14, 2015 02:22 IST2015-11-14T02:22:24+5:302015-11-14T02:22:24+5:30

१६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

Clash of firecrackers in two groups | फटाके फोडण्यावरून दोन गटांत हाणामारी

फटाके फोडण्यावरून दोन गटांत हाणामारी

अनसिंग (जि. वाशिम): घरासमोर फटाके फोडत असल्याच्या कारणावरून दोन गटांत काठीने मारहाण झाली. यावरून १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ही घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. अनसिंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेलू बु. येथील दोन गटांत फटाके घरासमोर फोडत असल्याच्या कारणावरून काठीने जबर मारहाण करण्यात आली. अनसिंग पोलीस ठाण्यात राजाराम हरिभाऊ गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रवि संजय वानखेडे, नीलेश संजय वानखेडे, बजरंग गजानन वानखेडे, प्रवीण गजानन वानखेडे, विठ्ठल गजानन वानखेडे, शरद गजानन वानखेडे, कावेरी गजानन वानखेडे, सीताबाई वानखेडे, दुर्गाबाई सीताराम वानखेडे, भागवत सखाराम वानखेडे, गजानन सखाराम वानखेडे अशा ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फटाके फोडण्यास विरोध करत असल्याच्या कारणावरून फिर्यादीला व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला मारहाण केली. दुसर्‍या गटातील फिर्यादी गजानन सखाराम वानखेडे (रा. शेलू बु.) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फटाके फोडण्याच्या कारणावरून आरोपी राजाराम गाडे, नंदा राजाराम गाडे, स्वाती अनवर व इतर दोन अशा पाच जणांनी काठीने मारहाण केली.

Web Title: Clash of firecrackers in two groups