उमरी येथे क्षुल्लक कारणावरून वाद; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

By Admin | Updated: May 11, 2017 06:49 IST2017-05-11T06:49:56+5:302017-05-11T06:49:56+5:30

अश्लील भाषेत शिवीगाळ; जीवे मारण्याची धमकीही दिली

Claims for minor reasons at Umri; The crime against the four | उमरी येथे क्षुल्लक कारणावरून वाद; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

उमरी येथे क्षुल्लक कारणावरून वाद; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

मानोरा : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या उमरी खुर्द येथे क्षुल्लक कारणावरून वाद होत फिर्यादीस आरोपींनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध १० मे रोजी गुन्हे दाखल केले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाबाराव राठोड यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले, की आरोपी विजय रावजी राठोड, संतोष विजय राठोड, नरेश सुरेश राठोड व सुरेश रावजी राठोड यांनी संगनमत करून तू कोर्टात केस का केली, त्यामुळे आम्हाला बांधकाम करण्यास परवानगी मिळत नाही, असे म्हणून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी नमूद चारही आरोपींविरुद्ध कलम २९४, ५०४, ३४ भादंवि अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

Web Title: Claims for minor reasons at Umri; The crime against the four