विभागीय कृषी सहसंचालकांचा नागरी सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:46 IST2021-08-25T04:46:46+5:302021-08-25T04:46:46+5:30
कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ समाजसेवक व भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष उत्तमराव आरू व ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी तथा गावकरी ...

विभागीय कृषी सहसंचालकांचा नागरी सत्कार
कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ समाजसेवक व भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष उत्तमराव आरू व ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी तथा गावकरी मंडळींनी केले होते. तोटावार यांनी सोयाबीन ग्राम बीजोत्पादन मोहीम २०२० राज्य स्तरावरील सन्मानपत्र, घरगुती बियाणे, बीजप्रक्रिया तथा उत्पादकता सन्मानपत्र तथा सोयाबीन पिकावरील अष्ठसूत्रीही आठ भाषेत प्रकाशित करून, वाशिम जिल्ह्याचे नाव संपूर्ण भारतात गौरविले आहे. त्याबाबत रिठद गावाच्या वतीने त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी विठ्ठलराव आऊ माजी सभापती, नारायणराव आरू मा.प. स. सदस्य, सुभाषराव बोरकर प्रदेश महासचिव संभाजी ब्रिगेड, बळीराम बोरकर माजी सरपंच, समाजसेवक राजूभाऊ आरू उपसरपंच, बालाजी बोरकर ग्राम.पं. सदस्य, गणेश आरू ग्रा.पं. सदस्य, पांडुरंग ठोकळ ग्रा.प. सदस्य, पवन आरू, रवि आरू, रामभाऊ बोरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तथा आभार इंगोले कृषी सहायक यांनी मानले.