लसीकरण मोहिमेचा शहरवासीयांनी लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:47 IST2021-09-12T04:47:44+5:302021-09-12T04:47:44+5:30

रिसोड : शहरामध्ये समता फाउंडेशनकडून राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेला दुसऱ्या डोससाठी ११ सप्टेंबरपासून प्रारंभ करण्यात आला आहे. ...

City dwellers should take advantage of the vaccination campaign | लसीकरण मोहिमेचा शहरवासीयांनी लाभ घ्यावा

लसीकरण मोहिमेचा शहरवासीयांनी लाभ घ्यावा

रिसोड : शहरामध्ये समता फाउंडेशनकडून राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेला दुसऱ्या डोससाठी ११ सप्टेंबरपासून प्रारंभ करण्यात आला आहे. नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष विजयमाला आसनकर यांनी केले आहे.

रिसाेड शहरातील ज्या नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. अशांना हा दुसरा डोस देण्यासाठी शहरांमध्ये पाच ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. यात उत्तमचंद बगडिया महाविद्यालय, भारत माध्यमिक शाळा, विश्वा लोन मालेगाव नाका, डॉ. अल्लामा इक्बाल स्कूल व एमएआयटी निजामपूर येथे दुसऱ्या डोसच्या लसीकरणाची सुविधा करण्यात आली आहे. संबंधित नागरिकांनी तेथे जाऊन आपले लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन रिसोड नगर परिषदेच्या अध्यक्ष विजयमाला आसनकर यांनी केले आहे.

110921\img_20210911_142215.jpg

लसीकरण मोहिमेचा शहरवासीयांनी लाभ घ्यावा नगराध्यक्षा

Web Title: City dwellers should take advantage of the vaccination campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.