कर्मचारी संपामुळे खोळंबली नागरिकांची कामे!
By Admin | Updated: September 3, 2016 02:02 IST2016-09-03T02:02:03+5:302016-09-03T02:02:03+5:30
सर्व संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग; कर्मचा-यांनी दिल्या शासनविरोधी घोषणा.

कर्मचारी संपामुळे खोळंबली नागरिकांची कामे!
वाशिम, दि. २ : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी केंद्रीय कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपाला वाशिम जिल्ह्यातील कर्मचार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या संपामुळे सर्वच शासकीय कार्यालयांमधील कामकाज बंद राहिल्याने नागरिकांची महत्त्वाची कामे खोळंबली.
केंद्रशासनाने अंगीकारलेल्या कर्मचारीविरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटनेच्या पदाधिकार्यांसह इतर कर्मचारी संघटनांनी संपात सहभाग घेऊन ह्यलेखणीबंदह्ण आंदोलन केले. जिल्ह्यातील सहाही तालुकास्थळी असलेल्या प्रशासकीय कार्यालयांमधील कर्मचार्यांनी एक दिवस काम बंद ठेवून आपापल्या कार्यालयांसमोर ठिय्या मांडला.
संपामुळे अधिकारी, पदाधिका-यांची तारांबळ
विविध कामगार संघटनांनी २ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपात जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत १५ संघटनांमधील सुमारे चार हजार कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्हा परिषदेमधील अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्व सभापती तसेच कार्यालयप्रमुख यांचे कक्षसुद्धा उघडण्यात न आल्यामुळे लोकप्रतिनिधी व अधिकार्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
महसूल कर्मचा-यांनी दिल्या घोषणा
महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विशाल डुकरे यांच्या नेतृत्वात ३५0 कर्मचार्यांनी संपात सहभाग घेत शासनाच्या कर्मचारीविरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष अतुल देशमुख, तात्यासाहेब नवघरे, सचिन मोरे यांच्यासह ३५0 कर्मचारी उपस्थित होते.