मंगरूळपीर येथे नागरिक बिनधास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:41 IST2021-03-18T04:41:09+5:302021-03-18T04:41:09+5:30

.............. नुकसानभरपाई देण्याची मागणी अनसिंग : कार्ली येथील सखूबाई गोविंदराव मार्गे यांच्या चार एकर शेतातील गव्हाला आग लागून ...

Citizens without any hesitation at Mangrulpeer | मंगरूळपीर येथे नागरिक बिनधास्त

मंगरूळपीर येथे नागरिक बिनधास्त

..............

नुकसानभरपाई देण्याची मागणी

अनसिंग : कार्ली येथील सखूबाई गोविंदराव मार्गे यांच्या चार एकर शेतातील गव्हाला आग लागून माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. याची नुकसानभरपाई अद्याप मिळाली नाही. नुकसानभरपाई देण्याची मागणी मार्गे यांनी केली आहे.

..............

हातपंप बंद; कृत्रिम पाणीटंचाई!

केनवड : केनवड जिल्हा परिषद गटातील अनेक गावांतील हातपंप बंद असल्याने गावकऱ्यांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हातपंप दुरुस्तीकडे पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने गावकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

..................

रिठद वळण मार्गावर फलकाचा अभाव

रिठद : रिठद- वाशिम मार्गावर रिठद फाट्यानजीक असलेला वळण मार्ग धाेकादायक असून, येथे फलक लावणे आवश्यक आहे; परंतु येथे फलक दिसून येत नसल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे. संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.

..............

अपघातात नीलगाय जखमी

शेलूबाजार : शेंदुरजना- धानोरा मार्गावर वाहनाच्या अपघातात नीलगाय जखमी झाल्याची घटना घडली. गेल्या महिनाभरात रस्ता अपघातात चार वन्यप्राणी जखमी झाले आहेत. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या नीलगायीवर उपचार केले.

Web Title: Citizens without any hesitation at Mangrulpeer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.