अन् नागरिक चक्क घरात कडी, कुलूप लावून बसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:15 IST2021-03-13T05:15:16+5:302021-03-13T05:15:16+5:30
काेराेनाबाधितांची वाढती संख्या पाहता प्रशासनाच्यावतीने नागरिकांच्या आराेग्यासाठी विविध प्रयत्न करताना दिसून येत आहे. तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही सुरू ...

अन् नागरिक चक्क घरात कडी, कुलूप लावून बसले
काेराेनाबाधितांची वाढती संख्या पाहता प्रशासनाच्यावतीने नागरिकांच्या आराेग्यासाठी विविध प्रयत्न करताना दिसून येत आहे. तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही सुरू केली आहे. तसेच ग्रामीण भागात वाढत असलेली काेराेनाबाधितांची संख्या पाहता, ज्या गावांमध्ये जास्त रुग्ण आढळून येत आहेत. त्या गावातील संपूर्ण नागरिकांची आराेग्य पथकाच्यावतीने काेराेना चाचणी कॅम्प आयाेजित करून घेतले जात आहेत. परंतु ग्रामीण भागातील नागरिक त्यांना प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येत आहे. गत दाेन दिवसांपूर्वी आराेग्य विभागाच्यावतीने कारंजा तालुक्यातील हिंगणवाडी, येळगाव येथे काेराेना चाचणी कॅम्पचे आयाेजन करण्यात आले हाेते. येथे आराेग्य पथकातील सदस्यही नागरिकांना चाचणी करून घेण्यासंदर्भात सांगत हाेते, तरीसुध्दा नागरिक घराबाहेर निघाले नाहीत. काही नागरिकांनी तर चक्क घराला कडी लावून आवाजसुध्दा दिला नाही. काहींनी घराला कुलूप लावून बाहेर चालले गेल्याचे दिसून आले. नागरिकांमध्ये काेराेना चाचणीबाबत गैरसमज असून, चाचणी केल्यास अहवाल पाॅझिटिव्हच येताे यामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काेराेना चाचणी करून घ्यावी, आपले व आपल्या परिवाराची, गावाची सुरक्षितता बाळगावी असे आवाहन आराेग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
....................
काेराेना चाचणीबाबत गैरसमज
गावागावात काेराेना चाचणी कॅम्पचे आयाेजन करण्यात येत असताना ग्रामस्थ पुढे न येण्यामागील कारणांचा शाेध घेतला असता ग्रामस्थांमध्ये चाचणी केली की अहवाल पाॅझिटिव्ह येताे, यामुळे ग्रामस्थ पुढे येत नसल्याचे समजते. आराेग्य विभागाने जनजागृती करणे आवश्यक आहे.
.............
ग्रामस्थांनी काेराेना चाचणी करून घेण्याचे आवाहन
काेराेनाबाधितांची संख्या पाहता ज्या गावात सर्वाधिक काेराेनाबाधित आढळून आलेत त्या गावांमध्ये कॅम्प आयाेजित करून ग्रामस्थांची चाचणी केली जात आहे. ग्रामस्थांनी घाबरून न जाता काेराेना चाचणी करून घ्यावी व आपले गाव काेराेनामुक्त ठेवावे असे आवाहन आराेग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.