पाणीपुरवठ्याअभवी नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:40 IST2021-04-18T04:40:08+5:302021-04-18T04:40:08+5:30

गैबीपुरानगरात पाणीपुरवठा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत नगर परिषदचे पाणीपुरवठा अभियंता राकेश जाधव यांना माहिती विचारली असता संबंधित ...

Citizens suffer due to lack of water supply | पाणीपुरवठ्याअभवी नागरिक त्रस्त

पाणीपुरवठ्याअभवी नागरिक त्रस्त

गैबीपुरानगरात पाणीपुरवठा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत नगर परिषदचे पाणीपुरवठा अभियंता राकेश जाधव यांना माहिती विचारली असता संबंधित नागरिकांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी एका कंपनीला काम दिले असून, मागील कित्येक दिवसांपासून आम्ही काम सुरू करतो, काही दिवस थांबा अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करीत आहे. तरीसुद्धा येत्या काही दिवसांत संबंधित कंपनीने काम सुरू केले नाही तर सदर कामाचे टेंडर रद्द करून नवीन टेंडर करून हा प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे ते म्हणाले.

याबाबत शेख हसन शेख लड्डू हे म्हणाले की भर उन्हाळ्यात नळाला पाणी येत नसल्यामुळे त्रस्त झालो असून, येत्या चार ते पाच दिवसांत नगर परिषदेने निवेदनाची दखल घेतली नाही तर नगर परिषदेसमोर उपोषण करणार असल्याची माहिती शेख हसन शेख लड्डू, संतोष सुखदेव पंडित, फिरोज खान पाशा खान, विनोद प्रल्‍हाद घुगे यांच्यासहित इतर नागरिकांनी दिली.

Web Title: Citizens suffer due to lack of water supply