नालेसफाईबाबत नागरिकांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:30 IST2021-05-30T04:30:59+5:302021-05-30T04:30:59+5:30
निवेदनात नमूद आहे की, चेहेलपुरा येथील वाॅर्ड क्रमांक ५ मध्ये मोठा नाला आहे. सदर नाला हे पूर्णपणे तुंबला असून ...

नालेसफाईबाबत नागरिकांचे निवेदन
निवेदनात नमूद आहे की, चेहेलपुरा येथील वाॅर्ड क्रमांक ५ मध्ये मोठा नाला आहे. सदर नाला हे पूर्णपणे तुंबला असून त्यात जागोजागी पाणी, कचरा व घाण साचली आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सदर नाला उपसण्याकरिता नगर परिषदेची जेसीबी मशीन आली होती; परंतु दोन फावडे मारून नाल्याचा पूर्णतः उपसा न करता तशीच परत गेली. नाला उपसला गेला नाही, त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संपूर्ण नाला उपसण्याची कार्यवाही करण्यात यावी, त्याशिवाय नाला उपण्याबाबतचे बिल मंजूर करण्यात येऊ नये अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.