पाण्यासाठी नागरिकांची उपविभागीय कार्यालयावर धडक
By Admin | Updated: April 26, 2017 19:09 IST2017-04-26T19:09:49+5:302017-04-26T19:09:49+5:30
मंगरुळपीर- शहरतील वॉर्ड क्रमांक १ व २ चा पाणीपुरवठा गेल्या तीन-चार वर्षांापसून बंद आहे. नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी वॉर्डातील महिलांनी बुधवारी उपविभागीय अधिकाºयांना निवेदन दिले.

पाण्यासाठी नागरिकांची उपविभागीय कार्यालयावर धडक
मंगरुळपीर : शहरातील वार्ड क्रमांक १ आणी २ मध्ये गेल्या तीन ते चार वर्षापासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी येथील महिलांनी उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक यांना मागण्याचे निवेदन सादर केले.
मंगरुळपीर नगरपालीका शहरवाशियांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा ही पालीकेची जबाबदारी आहे, मात्र पालीकेच्या गलथान कारभारामुळे या दोन्ही वार्डातील नागरीकांना गेली तीन वर्षापासुन पाणी मिळत नसल्यामुळे या भागातील पाण्यासाठी कोसोदुर भंटकती करावी लागत आहे. परिणामी अनेक संकटाशी सामना करावा लागत आहे. या भागातील नागरीकाकडे नळ कनेक्शन आहेत.परंतु नळाला पाणीच येत नसल्यामुळे येथील वयोवृध्द लहान मुलांना रात्री अपरात्री पाण्यासाठी भटकावे लागत आहे. या वार्डातुन नगरपालीकेची गेलेली पाईपलाईन अतीशय लहान आकाराची असुन या पाइपलाईनमधुन घरापर्यत पाणी पोहचत नसल्यामुळे नळ हे शोभेची वास्तु झाली आहे ही बाब लक्षात घेऊन या भागात मोठ्या आकाराची पाईप लाईन टाकल्यास नागरीकांना पाणी मिळैल या पाईन लाईनच्या मागणीसाठी वारंवार पालीकेकडे पाठपुरावा केला, परंतु अद्यापही दखल न घेतल्यामुळे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. या बाबीची तात्काळ दखल घेउन याठीकाणी मोठी पाईन टाकुन पाणी पुरवठा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी निवेदनात केले आहे. या निवेदनावर माजी नगराध्यक्षा बानोताई चौधरी, तुकडीया कलरवाले, खन्नुभाई नंदावाले, मोहम्मद चौधरी ,रहीम नंदावाले, रमजान परसुवाले ,जमील कुरेशी, अबरार कुरेशी, सादीकभाई आरीफ कलरवाले, सलीम मोहनावाले ,सादीक परसुवाले, राजेश मोहनावाले आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.