शांततेसाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक
By Admin | Updated: September 5, 2014 23:55 IST2014-09-05T23:34:28+5:302014-09-05T23:55:47+5:30
शांततापुर्ण गणोशोत्सवासाठी कारंजालाड येथे शांतता समितीची बैठक उत्साहात

शांततेसाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक
कारंजालाड : शांतता व सुव्यवस्थेसाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. पोलीसांचे मित्र होवून गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी केले. येथील पोलीस स्टेशनच्या आवारात ४ सप्टेंबरला पार पडलेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विलासराव देशमुख, तहसीलदार श्रीकांत उंबरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय नाफडे उपस्थित होते. या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अनेक सूचना मांडल्या व पोलीस प्रशासनाकडून चांगल्या कार्याची अपेक्षा व्यक्त कली. गणेशोत्सव मिरवणुकीत गुलालाऐवजी फुलांचा वापर करावा. शहरातील खराब रस्ते, प्रदुषण, मोकाट जनावरे, चिडीमार, बंद पथदिवे, अल्पवयीन मुलांची वाहन चालविण्याची पद्धत, डीजे आदी विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रास्ताविक पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांनी केले. बैठकीत श्याम सवाई, मौलाना इक्बाल, दिलीप रोकडे, राजाभाऊ चव्हाण, प्रा.ए.एस.शेख, प्राचार्य डॉ.गजानन पेढीवाल, नरेन्द्र गोलेच्छा, मौलाना हाफीस, सैय्यद अहमद यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ.दिवाकर इंगोले तर आभारप्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गुहे यांनी केले. बैठकीला शांतता समितीचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, महिला, पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.