वीज वितरण कार्यालयाला घेराव
By Admin | Updated: October 13, 2014 01:58 IST2014-10-13T01:58:37+5:302014-10-13T01:58:37+5:30
उंबर्डाबाजार तथा मनभा परिसरात अनियमित वीज पुरवठा. ग्रामस्थ त्रस्त.

वीज वितरण कार्यालयाला घेराव
उंबर्डाबाजार (वाशिम) : शेतीला होणार्या अनियमित वीज पुरवठय़ाबाबत उंबर्डाबाजार तथा मनभा परिसरातील संतप्त शेतकर्यांनी १0 ऑक्टोबर रोजी उंबर्डाबाजार वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देवून वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांना घेराव घातला. यावेळी शेतीला सुरळीत वीज पुरवठा करण्याची जोरदार मागणी संतप्त शेतकर्यांनी केलीे. सततच्या अनियमित विज पुरवठय़ामुळे परिसरातील शेतकरी वैतागले होते. विज वितरणच्या अधिकार्यांकडून या प्रकरणी कोणतच पावले उचलण्यात येत नसल्याचे पाहून संतप्त झालेल्या शे तकर्यांनी विज वितरणच्या अधिकार्यांना १0 ऑक्टोबर रोजी घेराव घातला.