बाल हक्क जागृती सप्ताहाचा समारोप
By Admin | Updated: November 23, 2014 00:09 IST2014-11-23T00:09:19+5:302014-11-23T00:09:19+5:30
वाशिम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बाल न्याय मंडळ, बाल कल्याण समितीचा संयुक्त उपक्रम.

बाल हक्क जागृती सप्ताहाचा समारोप
वाशिम : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बाल न्याय मंडळ, बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्ष वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने १४ नोव्हेंबर ते २0 नोव्हेंबर २0१४ या कालावधीत बाल हक्क जागृती सप्ताह राबविण्यात आला. बाल हक्क सप्ताहाचा समारोप २0 नोव्हेंबर रोजी जागतिक बाल ह क्क दिनी जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
जिल्हाधिकारी यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बाल न्याय मंडळ, बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्ष वाशिम यांनी राबविलेल्या बाल हक्क जागृती सप्ताहानिमित्त जिल्हाभर राबविण्यात आलेल्या जागृतीपर कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. बालकांवर होणार्या अ त्याचारास आळा घालण्याच्या दृष्टीने हे कार्य कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. उपस्थित बालकांना बाल हक्काविषयी माहिती देवून आम्ही सर्व मोठी माणसं पालक असून बालकांना सुरक्षीत वा तावरण देणे आम्हा सर्व मोठयांची जबाबदारी आहे आणि ते मिळवून देण्याकरिता पालक म्हणून आम्ही सर्व बांधील असल्याचे नमुद केले.