शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

वाशिम जिल्हयात बालविवाहाचे प्रमाण वाढले! जनजागृतीचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 18:51 IST

वाशिम : बालविवाह करणे कायदयाने गुन्हा असतांना जिल्हयात बालविवाहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून संबधितांच्या पुढाकाराने ते रोखल्या गेलेत म्हणून ...

वाशिम : बालविवाह करणे कायदयाने गुन्हा असतांना जिल्हयात बालविवाहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून संबधितांच्या पुढाकाराने ते रोखल्या गेलेत म्हणून सदर प्रकरण उघडकीस येत आहेत. जनजागृतीअभावी बालविवाहात वाढ होणे चिंताजनक झाले आहे.जिल्हयात सलग दोन दिवसात दोन बालविवाह ‘चाईल्ड लाईन’च्या माध्यमातून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी रोखले. बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ नुसार बालविवाह घडवून आणणे, तत्संबंधित सर्व सोहळे व इतर गोष्टीवर प्रतिबंध घातला आहे. तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी पूर्ण राज्यासाठी किंवा विभागनिहाय एक वा अनेक व्यक्तींची 'बालविवाह प्रतिबंध अधिकारी' म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अधिकारी आपले कार्य करीत असले तरी माणसाची मानसिकतेत अद्याप बदल झाला नसल्याचे होत असलेल्या बालविवाहावरुन दिसून येते.समाजात बालविवाहाचे दुष्परिणाम सांगून होणाऱ्या घातक परिणामांबद्दल जाणीव आणि जनजागृती होत नसल्याने यामध्ये वाढ होत आहे असे म्हटल्यास वावगे ठरु नये. मानोरा तालुक्यातील फुलउमरी (सोमेश्वर नगर) येथे १७ जून रोजी १४ वर्षिय मुलीचा व रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह १८ जून रोजी प्रशासनाच्या खबरदारीने रोखल्या गेला. यापूर्वी १० दिवसापूर्वी एक असाच विवाह रोखल्या गेला आहे. अशी आहे शिक्षा१८ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधुशी विवाह केल्यास त्या पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाखपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणाºयास , त्यासाठीचा सोहळा पार पाडणाºयास किंवा प्रोत्साहन देणाºयास दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि .एक लाखपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.बालविवाह झाल्यास, संबंधित वर वा वधू यांचे आईवडील किंवा पालक, अन्य नातेवाईक मित्र परिवार असे सर्व, ज्यांनी हा विवाह घडविण्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, वा जे अशा विवाहात सामील झाले होते अशा सर्वांना दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद व एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो .

टॅग्स :washimवाशिम