शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

रिसोड तालुक्यात मुलीचा बालविवाह रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 12:36 PM

‘चाईल्ड लाईन’च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष संतराम राठोड यांना या बाल विवाहाविषयी माहिती मिळाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे रिसोड तालुक्यातील चिंचाबा भर येथील अल्पवयीन बालिकेचा ५ जून रोजी होणारा नियोजित विवाह १ जून रोजी रोखण्यात आला. ‘चाईल्ड लाईन’च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष संतराम राठोड यांना या बाल विवाहाविषयी माहिती मिळाली होती.रिसोड तालुल्यातील चिंचाबा भर येथील एका १६ वर्षीय मुलीचा ५ जून २०२० रोजी विवाह होणार असल्याची माहिती ‘चाईल्ड लाईन’च्या माध्यमातून महिला व बालविकास विभागाला मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने राठोड यांनी बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष डॉ. जयश्री गुट्टे, रिसोडचे पोलीस निरीक्षक संतोष नेमनार, बीट जमादार अनिल कातडे, पोलीस कॉन्स्टेबल सतिश मुसळे, ‘चाईल्ड लाईन’ वाशिमचे महेश राऊत, बालविवाह प्रतिबंध अधिकारी तथा ग्रामसेवक इंगळे, रिसोड तालुका कनिष्ठ संरक्षण अधिकारी घुगे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संरक्षण अधिकारी लक्ष्मी एस. काळे, कायदा तथा परीविक्षा अधिकारी जिनसाजी एम चौधरी, सामाजिक कार्यकर्ता अनंता पी. इंगळे यांच्याशी संपर्क करून बालविवाह रोखण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत कळविले. त्यानुसार १ जून रोजी बालविवाह रोखण्याची कार्यवाही करण्यात आली.

 अल्पवयीन मुलीचे वडील व कुटुंबियांचे समुपदेशनमहिला व बाल विकास विभागाचे सर्व अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांसह चिंचाबा भर येथे जावून पोलीस पाटील व अल्पवयीन मुलीचे वडील व कुटुंबियांचे समुपदेशन केले. तसेच त्यांच्याकडून बाल विवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत हमीपत्र लिहून घेतले. गावपरिसरात कुठेही बालविवाह होत असल्याचे माहिती देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

वाशिम जिल्ह्यात बालविवाह रोखण्याची कार्यवाही महिला व बालविकास विभागातर्फे केली जात आहे.वर्षभराच्या कालावधीत जवळपास ८ ते ९ बालविवाह रोखण्यात आले.- सुभाष राठोड,बालविकास अधिकारी, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड