डेंग्यूसदृश तापाने बालकाचा मृत्यू
By Admin | Updated: October 12, 2014 00:43 IST2014-10-12T00:43:08+5:302014-10-12T00:43:08+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील डोमरूळ धाड परिसरात डेंग्यूसदृष तापाचा प्रकोप.

डेंग्यूसदृश तापाने बालकाचा मृत्यू
डोमरूळ धाड (बुलडाणा): परिसरात डेंगू सदृश्य तापाचे रूग्ण आढळले आहे. डेग्यू सदृश्य तापाने म्हसला येथील एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ९ ऑक्टोबर रोजी घडली. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
म्हसला येथील ४ वर्षीय ऋषीकेश भागवत भोंडे याला बुलडाणा व नंतर औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याचा ताप कमी झाला नाही. आणि ५ ऑक्टोबर रोजी त्याचे निधन झाले. परिसरातील चांडोळ, रूईखेड मायंबा, मोहोज, म्हसला बु. येथील डेंगू सदृश्य तापाचे अनेक रूग्ण जिल्हा सामान्य रूग्णालयासह खाजगी रूग्णालय तसेच औरंगाबाद येथे उपचार घेत आहेत. याबाबत म्हसला खु. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिसरात रुग्णांचा तपासण्या केल्या. त्यात सर्व रूग्ण डेंगू सदृश्य तापाचे असल्याचेआढळून आले.