नगराध्यक्षांसह चौघांचे निकाल ‘जैसे थे’!

By Admin | Updated: October 25, 2016 18:07 IST2016-10-25T02:50:54+5:302016-10-25T18:07:10+5:30

उच्च न्यायालयात झाली सुनावणी.

The Chiefs of the four leaders were 'like'! | नगराध्यक्षांसह चौघांचे निकाल ‘जैसे थे’!

नगराध्यक्षांसह चौघांचे निकाल ‘जैसे थे’!

शेगाव, , दि. २४- कॉंग्रेस पक्षाच्या गटनेत्याने दिलेला ह्यव्हीपह्ण नाकारण्यासोबतच काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान न केल्यामुळे येथील नगराध्यक्ष शारदा गोपाल कलोरे यांना पदावरुन अपात्र करण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सोमवारी या प्रकरणाबाबत झालेल्या सुनावणीत ह्यजैसे थेह्णचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
शेगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक दीड वर्षांपूर्वी घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाने शैलेंद्र पाटील यांना अधिकृत उमेदवारी दिली होती. या उमेदवाराला मतदान करण्याबाबत पक्षाच्या सर्व सदस्यांना गटनेते शिवाजी बुरुंगले यांनी पक्षादेश दिल्यानंतरही विद्यमान नगराध्यक्ष शारदा कलोरे यांच्यासह योगिता अग्रवाल, किरण देशमुख यांनी पक्षादेशाविरुद्ध मतदान केले. त्यामुळे या नगरसेवकांना पदावरून अपात्र करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित चारही नगरसेवकांना अपात्र घोषित केले.
जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणात पुन्हा फेरतपासणी करून निकाल द्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले होते. दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी १५ ऑक्टोबर रोजी फेरसुनावणी घेत उपरोक्त चारही नगरसेवकांना अपात्र घोषित केले.
जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयावर स्थगनादेश मिळविण्यासाठी या नगरसेवकांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात सोमवारी सुनावणी घेण्यात आली असून, जिल्हाधिकार्‍यांचे आदेश ह्यजैसे थेह्ण ठेवण्याबाबत न्यायालयाने निर्वाळा दिला आहे. या प्रकरणात शिवाजी बुरुंगले यांच्याकडून अँड.अजय घारे व अँड. प्रदीप क्षीरसागर यांनी काम पाहिले असून, शारदा कलोरे यांच्यातर्फे अँड.भंडारकर यांनी काम पाहिले आहे.

Web Title: The Chiefs of the four leaders were 'like'!