भ्रमणध्वनीवर एटीएमची चौकशी करुन फसवणूक
By Admin | Updated: March 24, 2015 00:40 IST2015-03-24T00:40:59+5:302015-03-24T00:40:59+5:30
वाशिम येथील घटना.

भ्रमणध्वनीवर एटीएमची चौकशी करुन फसवणूक
वाशिम : स्टेट बँकेतील आपले बँक खाते बंद झाले असून अशी बतावणी करुन बँकेचे खाते क्रमांक, पासबूक क्रमांक, एटीएम कार्ड, कोड क्रमांक आदी माहिती भ्रमणध्वनीवर विचारुन अज्ञात व्यक्तीने आपल्या खात्यातील २१ हजार ९९ रुपये लंपास केल्याची जगदीश प्रेमसिंग जाधव रा. इलखी या युवकाने २0 मार्च रोजी अनसिंग पोलीस स्टेशनला दिली आहे. अनसिंग पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी जगदीश जाधव यांनी आपल्या दिलेल्या तक्रारीत नमुद केले की, १७ मार्च रोजी सायंकाळी ५.४0 वाजता च्या दरम्यान एका व्यक्तिने भ्रमणध्वनी क्रमांक 0८३३५९0४९७४ यावरुन आपणास कॉल केला. यावेळी त्याने मला सांगितले की, स्टेट बँकेतील आपले खाते बंद झाले असून ते सुरू करायचे आहे. व मला माझा खाते क्रमांक, पासबूक क्रमांक, एटीएम कोड क्रमांक इत्यादी माहिती विचारली. बँकेतून फोन आहे असे समजून मी संपूर्ण माहिती दिली. मात्र त्यानंतर आपण स्वत: बँकेत जावून चौकशी केली असता आपल्या खात्यातून २१ हजार ९९ रुपये काढण्यात आल्याचे उघडकीस आल, असे म्हटले आहे. सदर प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले असून याबाबत त्वरित चौकशी करावी व मला न्याय देण्याची मागणी केली आहे.अनसिंग पोलिसांनी सदर प्रकरण चौकशीत नोंद करुन तपास करीत आहेत.