वाहनचालक परवानासाठी "सारथी" प्रणाली

By Admin | Updated: May 30, 2017 19:58 IST2017-05-30T19:58:45+5:302017-05-30T19:58:45+5:30

वाशिम : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशिम अंतर्गत शिकाऊ व पक्की वाहनचालक अनुज्ञप्तीकरीता (ड्रायव्हिंग लायसन्स) "सारथी" प्रणाली जून २०१७ पासून कार्यान्वित करण्यात येत आहे.

"Charioteer" system for driving license | वाहनचालक परवानासाठी "सारथी" प्रणाली

वाहनचालक परवानासाठी "सारथी" प्रणाली

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशिम अंतर्गत घेण्यात येणाऱ्या तालुकानिहाय मासिक शिबीरामध्ये होणारे शिकाऊ व पक्की वाहनचालक अनुज्ञप्तीकरीता (ड्रायव्हिंग लायसन्स) "सारथी" प्रणाली जून २०१७ पासून कार्यान्वित करण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी वाहनचालक अनुज्ञप्ती करीता उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेस्थळावरुन पूर्व नाव नोंदणी (अपॉईन्टमेन्ट) घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी कळविले आहे.

 

Web Title: "Charioteer" system for driving license