विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता
By Admin | Updated: October 17, 2014 00:08 IST2014-10-16T23:22:10+5:302014-10-17T00:08:15+5:30
हुडहुड चक्रीवादळामुळे विदर्भात पावसाचे वातावरण; येत्या २४ तासात विदर्भातील काही भागात पाऊस

विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता
अकोला : हुडहुड चक्रीवादळामुळे विदर्भात पावसाचे वातावरण तयार झाले असून, येत्या २४ तासात विदर्भातील काही भागात पाऊस येण्याची शक्यता नागपूर येथील हवामानशास्त्र विभागाने दिली. विदर्भात पावसाचे वातावरण तयार झाले असून, ढगाळ वातावरण आहे. पूर्व विदर्भात काही ठिकाणी पाऊस कोसळला. मध्य व पश्चिम विदर्भावर ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे येत्या ४८ तासात पाऊस येण्याची शक्यता आहे. दरम्यान, कापूस पिकासाठी पावसाची नितांत गरज असून, रब्बी पिकांचे भविष्य या पावसावरच अवलंबून आहे. त्यामुळे मृग नक्षत्राची जशी प्रतीक्षा केली जाते, तशीच प्रतीक्षा या अवकाळी पावसाची केली जात आहे.