शेतक-यांचा शेतमाल परत करण्याचे पोलिसांपुढे आव्हान

By Admin | Updated: February 1, 2016 02:28 IST2016-02-01T02:28:17+5:302016-02-01T02:28:17+5:30

कायद्याची अडचण; वाशिम जिल्हय़ातील शेतमाल चो-यांचा उलगडा.

Challenge to returning the farmer's commodity to the police | शेतक-यांचा शेतमाल परत करण्याचे पोलिसांपुढे आव्हान

शेतक-यांचा शेतमाल परत करण्याचे पोलिसांपुढे आव्हान

वाशिम/मंगरूळपीर: चोरी गेलेला मुद्देमाल चोर पकडल्यानंतर मूळ मालकाला द्यावा लागतो; मात्र तूर व सोयाबीनसारखा शेतमालाची ओळख पटत नसून, खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांनीही कायद्याच्या चौकटीत राहूनच खरेदी केली असल्यामुळे तो माल शेतकर्‍यांना परत करण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची खरेदी करताना व्यापार्‍यांना शेतकर्‍यांचा सातबारा पाहण्याचा कायदा नाही. त्यामुळे व्यापार्‍यांनी खरेदी केलेला शेतमाल चोरीचा असला हे सिद्ध झाले तरी तो जप्त करता येत नाही. दुसरीकडे चोरट्यांकडून जप्त केलेली तूर किंवा सोयाबीन कुणाचे, हे ओळखणे कठीण आहे. त्यामुळे पोलिसांपुढे आता या चोरी प्रकरणात जप्त केलेला शेतमाल शेतकर्‍यांना परत करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत २९ जानेवारी रोजी पकडण्यात आलेल्या सातही आरोपींना ३0 जानेवारी रोजी स्थानिक प्रथम ङ्म्रेणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. उल्लेखनीय म्हणजे विविध ठिकाणी दुचाकी, सोयाबीन व तूर चोरी तथा अनेक प्रकारच्या चोर्‍या झाल्या होत्या. या चोर्‍यांचा तपास योग्य दिशेने जात नव्हता. मागील काळात तालुक्यात मोठय़ा प्रमाणात चोर्‍या झाल्या होत्या. अखेर आसेगाव, मंगरूळपीर, अनसिंग आणि जऊळका ठाणेदारांच्या संयुक्त कारवाईत जिल्हय़ातील शेतकर्‍यांची रात्रीची झोप उडविण्यार्‍या वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या माळेगाव येथून आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या आरोपींकडून १४ लाख ८0 हजार रुपयांचा चोरी केलेला माल जप्त करण्यात आला होता. या चोरट्यांकडून आणखी चोरीचा तपास करता यावा म्हणून प्रथम ङ्म्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले असता सातही आरोपींना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पहिल्याच दिवसाच्या पोलीस कोठडीत चोरट्यांनी तालुक्यातील कंझरा येथून २२ क्विंटल तूर, शेलूबाजार येथून दोन घटनेत ५0 क्विंटल, तसेच हिरंगी येथून ३५ क्विंटल सोयाबीन, जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या बोर्‍हाळा येथून २0 क्विंटल सोयाबीन, वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनमधील कोकलगाव येथून १५ क्विंटल तसेच वाशिम शहरातील आययूडीपी कॉलनी येथून २५ क्विंटल सोयाबीन आणि आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या फाळेगाव येथून १५ क्विंटल तूर चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Challenge to returning the farmer's commodity to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.