ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:40 IST2021-03-21T04:40:26+5:302021-03-21T04:40:26+5:30
वाशिम : जिल्ह्यातील शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढतच आहे. जिल्ह्यात १३ मार्च ते १९ मार्च या ...

ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्याचे आव्हान
वाशिम : जिल्ह्यातील शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढतच आहे. जिल्ह्यात १३ मार्च ते १९ मार्च या सात दिवसांच्या कालावधीत १,३४१ व्यक्तिंना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. त्यामध्ये ग्रामीण भागातील बाधितांची संख्या ७७६ होती. अर्थात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचे प्रमाण जवळपास दीडपट असून, ग्रामीण भागातील ही वाढती रुग्णसंख्या नियंत्रित करण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे आहे.
शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या कमी असते, तसेच बाजारपेठा लहान असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढीस फारसा वाव मिळणे कठीण असते; परंतु ग्रामीण भागातील जनतेचा शहरात विविध कामांसाठी होणारा प्रवास तसेच नियमांच्या पालनाकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागात कोरोना संसर्ग आटोक्याबाहेर गेला आहे. त्यात मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यांसह वाशिम तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक आहे.
-----------------
जिल्हा सीमेलगतची गावे ठरताहेत ‘हॉटस्पॉट’
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण नियंत्रणाच्या बाहेर जात आहे. प्रामुुख्याने ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा उद्रेकच सुरू असून, जिल्हा सीमेवर असलेली गावे कोरोना संसर्गाचे ‘हॉटस्पॉट’ ठरत आहेत. यात कारंजा तालुक्यातील धनज बु.सह काही गावांमध्ये कन्टेनमेंट झोनची संख्या लक्षणीय आहे, तर मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार या गावाच्या सर्व सीमाच पाच दिवसांसाठी सील करण्यात आल्या आहेत. कारंजा तालुक्यातील कामरगाव, सोमठाणा, धनज बु., खेर्डा, उंबर्डा बाजार, बेंबळा तर मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार, वनोजा या जिल्हा सीमेलगतच्या गावांमध्ये आठवडाभरात १५०पेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत.
-----------------
१८ मार्च- २०३
शहर - ग्रामीण
९८ - १०५
---------------
१७ मार्च - २४७
शहर - ग्रामीण
८८ - १५९
---------------
१६ मार्च - २१८
शहर - ग्रामीण
१०४ - ११४
---------------
१५ मार्च - २०८
शहर - ग्रामीण
९९ - १०९
--------------
१४ मार्च वाशिम जिल्ह्यात आणखी १६० कोरोनाबाधित
शहर - ग्रामीण
५८ - १०२
-----------------
१३ मार्च - १५५
शहर - ग्रामीण
५७ - ९८
-----------------
जिल्हा सीमेवरील गावांची आठवड्यातील स्थिती
कामरगाव
१९ मार्च - २०७ शहर - ग्रामीण
रुग्ण - ११८ - ८९
१८ मार्च - २०३ शहर - ग्रामीण
रुग्ण - ९८ - १०५
---------------------------
१७ मार्च - २४७ शहर - ग्रामीण
रुग्ण - ८८ - १५९
---------------
१६ मार्च - २१८ शहर - ग्रामीण
रुग्ण - १०४ - ११४
---------------
१५ मार्च - २०८ शहर - ग्रामीण
रुग्ण - ९९ - १०९
--------------
१४ मार्च - १६० शहर - ग्रामीण
रुग्ण - ५८ - १०२
--------------------
१३ मार्च - १५५ शहर - ग्रामीण
रुग्ण - ५७ - ९८
ग्रामीण भागात आढळलेले बाधित - ७७६
शहरी भागात आढळलेले बाधित - ५६५