तंटामुक्त गावांपुढे ‘एक गाव एक गणपती’ चे आव्हान
By Admin | Updated: August 27, 2014 00:19 IST2014-08-27T00:10:07+5:302014-08-27T00:19:15+5:30
शासनाच्या माहिमेला भक्तांचा मिळाला वेळोवेळी प्रतिसाद

तंटामुक्त गावांपुढे ‘एक गाव एक गणपती’ चे आव्हान
मानोरा : गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसावर येऊन ठेपला आहे. गावागावात गणरायाची स्थापना केली जाते. मात्र एकाच गावात अनेक ठिकाणी गणरायाची स्थापना केली जाते. मात्र खेडेगावात शांतता राखण्याच्या दृष्टीने ह्यएक गाव एक गणपतीह्ण उपक्रम राबविणे महत्वाचे असून हा उपक्रम राबविण्याचे आव्हान तंटामुक्त समित्यांपुढे उभे ठाकले आहे. गावातील तंटे गावातच समोपचाराने मिटविण्यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली आहे. मागील सात वर्षात या मोहिमेला मोठे यशही मिळत आहे. गावातील तंटे गावात मिटवून शांतता व सुव्यवस्था निर्माण होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात पोलीसांवर कायदा व सुव्यवस्थेचा मोठा ताण असतो. यासाठी तंटामुक्त समितीने पुढाकार घेण्याची गरज आहे. एका गावात एकच गणपती स्थापन केल्यास गावातील शांतता भंग होणार नाही. मानोरा शहरासह तालुक्यात मोठय़ा प्रमाणात गणेश मंडळ स्थापन केले जातात. गावागावात एकापेक्षा अधिक गणेश मंडळाची स्थापना होत आहे. हा प्रकार टाळण्यासाठी तंटामुक्त समित्यांनी पुढाकार घेऊन गावातील तरूणांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. गावात एकच गणपती असेल तर गटबाजी निर्माण होणार नाही. वादविवाद टाळले जातील. गावाची शांतताही भंग होणार नाही. परिणामी गावाची सामाजिक, सांस्कृतिक ओळख निर्माण होईल. यासाठी एक गाव एक गणपती यावर भर देण्याची गरज आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम ही लोकचळवळ आहे. या चळवळीच्ी धुरा खांद्यावर घेणार्या कार्यकर्त्यांना गावात तंटामुक्तीसाठी उपाय करावयाचे आहे. त्यातीलच एक गाव एक गणपती हा महत्वाचा उपक्रम आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनाला खंबिरपणे या तंटामुक्त समित्यांच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे. अनेक गावांनी एक गाव एक गणपती हा उपक्रम सुरू करावा. तंटामुक्त गाव समिती आणि गावकर्यांच्या सहकार्यातून प्रबोधनात्मक कार्यक्रमाने गावकर्यांचे मतपरिवर्तन होईल या कुणालाही शंका नाही.