भाजपाच्या धोरणामुळे तरुणात चैतन्य
By Admin | Updated: September 7, 2014 03:00 IST2014-09-07T03:00:17+5:302014-09-07T03:00:17+5:30
वाशिम विधानसभा मतदारसंघ : इच्छुकांची संख्या वाढली.

भाजपाच्या धोरणामुळे तरुणात चैतन्य
वाशिम : विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर भाजपने चाणक्य नामक संस्थेमार्फत केलेल्या सर्व्हेक्षणाचा अहवालात विदर्भातील ६२ विधानसभा मतदारसंघांपैकी अनुसूचित जा तीसाठी ९ तर अनुसूचित जमातीसाठी ७ मतदारसंघ राखीव आहेत. या मतदारसंघांमध्ये नवीन चेहर्याला संधी देण्याची रणनीती भाजपाचे धोरण असल्याच्ी माहिती इच्छुक उमेदवारांना झाल्याने वाशिम विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या नवीन चेहर्यांवर हास्य फुलले असून, सकाळपासूनच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना घेऊन ह्यआता जमतेचह्ण कामाला लागण्याचा सल्ला नवीन इच्छुक उमेदवाराकडून दिल्या जात आहे. वाशिम विधानसभा मतदार संघात भाजपाच्या इच्छुक उमेदवाराची मोठी यादी असली तरी ७ जण आपल्याला उमेदवारी मिळावी याकरिता जोरदार फिल्डिंग लावताना दिसून येत आहेत. यामध्ये काही लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. तसेच ५ नवीन चेहरे असून, या सर्वांना आ ता आपलेच जमते, असे वाटत आहे. सर्वांनी पुन्हा जोमाने कामास सुरुवात केली असून, म तदारांच्या भेटीगाठी वाढविल्या आहेत. काही दिवसांआधी वाशिम विधानसभा मतदारसंघातील एका इच्छुक उमेदवाराने मोठय़ा प्रमाणात फिल्डिंग लावली होती; मात्र त्यांचे नावच कुठेही नसल्याने विविध चर्चांना रंगत येत आहे. काही दिवसांआधी भाजपामध्ये आरोप -प्रत्यारो पाच्या राजकारणासही सुरुवात झाली होती; मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यास विलंब होत असल्याने सर्वत्र शांतता पसरली असतानाच मधातच चाणक्य नामक संस्थेच्या अहवालाची चर्चा भाजप वतरुळात पसरली व पुन्हा या पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे. पक्षात इमाने इतबारे काम करणारे पण विधानसभा लढविणारे काही नवीन चेहरे या अहवालामुळे अतिशय आनंदित झाले असून, त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. चाणक्य संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात काही विद्यमान आमदारांनाही डच्चू देण्याची शिफारस करण्यात आली असल्याच्या माहितीने वाशिम विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार असल्याच्या चर्चेने राजकीय वतरुळासह जनतेत विविध विषयांवर गप्पा होताना दिसून येत आहेत.