सभापतीच्या पतीची पंचायत समितीच्या कर्मचा-यास मारहाण!

By Admin | Updated: January 6, 2017 02:22 IST2017-01-06T02:22:37+5:302017-01-06T02:22:37+5:30

मंगरूळपीर पं.स.मधील प्रकार; कर्मचा-यांनी घेतला ‘काम बंद’चा पवित्रा.

Chairperson's husband's panchayat committee worker assaulted! | सभापतीच्या पतीची पंचायत समितीच्या कर्मचा-यास मारहाण!

सभापतीच्या पतीची पंचायत समितीच्या कर्मचा-यास मारहाण!

मंगरुळपीर, दि. ५- येथील पंचायत समिती कार्यालयातील कनिष्ठ सहायक डी.एल.गांजरे यांना गुरूवार, ५ नोव्हेंबर रोजी पंचायत समिती सभापतीचे पती गणेश देशमुख यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेचा निषेध नोंदवित कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात गटविकास अधिकार्‍यांकडे कर्मचार्‍यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की गुरूवारी सकाळी गणेश देशमुख यांनी पंचायत समिती कार्यालयाचे कनिष्ठ सहायक डी.एल.गांजरे यांना गणेश देशमुख यांनी सभापती क क्षामध्ये बोलावून घेतले. यावेळी गिंभा येथील शौचालयाचे मस्टर का काढले नाही, असा प्रश्न उपस्थित करून मी सांगितल्याशिवाय कुठलेच काम करायचे नाही, असे म्हणत वाद घालून देशमुख यांनी गांजरे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली व मारहाण केली. वास्तविक पाहता, गिंभा येथील शेतकर्‍यांचे मस्टर काढणे ही बाब पूर्णपणे नियमानुसार आहे. त्यामध्ये कोणतीही कृती बेकायदेशीर नाही. त्यात हस्तक्षेप करणे, ही बाब कायद्याचा भंग करणारी आहे. त्यामुळे देशमुख यांनी उपरोक्त शासन निर्णयाचा भंग केला आहे. तथापि, गांजरे यांना झालेल्या मारहाणीमुळे कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशांतता पसरली आहे. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये काम करण्याची मानसिकता राहिलेली नाही. जोपर्यंंंत गांजरे यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंंंत कामबंद आंदोलन सुरू राहील, असा इशारा कर्मचार्‍यांनी दिला आहे.

Web Title: Chairperson's husband's panchayat committee worker assaulted!