सीईओंच्या दालनात ज्येष्ठता यादीवर आज होणार मंथन!

By Admin | Updated: September 30, 2015 01:24 IST2015-09-30T01:24:28+5:302015-09-30T01:24:28+5:30

वाशिम जिल्हा परिषदेत कर्मचारी संघटनेची मागणी मान्य केल्याने सविस्तर चर्चा होणार.

CENTRAL CENTERS'S JESTALITY LIST TO BOOK TODAY! | सीईओंच्या दालनात ज्येष्ठता यादीवर आज होणार मंथन!

सीईओंच्या दालनात ज्येष्ठता यादीवर आज होणार मंथन!

वाशिम : जिल्हा परिषदेने प्रकाशित केलेल्या ज्येष्ठता यादीवर कर्मचारी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या विषयावर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या दालनात ३0 सप्टेंबर रोजी सविस्तर चर्चा होणार आहे. या विषयावर चर्चा करण्याची मागणी कर्मचारी संघटनेने केली होती. वाशिम जिल्हा परिषदेने सेवा ज्येष्ठता यादी तयार केली आहे. सन २00३ पासून चुकीच्या ज्येष्ठता याद्या प्रकाशित करुन आजपर्यंत पदोन्नत्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयंत देव यांनी केला होता. ९ सप्टेंबर २0१५ रोजी सामान्य प्रशासन विभागाने जानेवारी २0१४ व २0१५ ची सर्व संवर्गाची ज्येष्ठता यादी प्रकाशित केली आहे. सदरहू ज्येष्ठता यादीवर २८ सप्टेंबर २0१५ पर्यंत आक्षेप नोंदवावयाचे होते. मात्र, सदर यादी काही ठिकाणी लावण्यात आली नाही. परिणामी कर्मचार्‍यांना आक्षेप नोंदविता आले नाहीत. ज्येष्ठता यादी आणि त्यावरील आक्षेप या विषयावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांशी सविस्तर चर्चा करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली होती. या मागणीची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी ३0 सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. जि.प. प्रशासनाने आक्षेप घेण्याकरीता २0 दिवसाचा अवधी दिला होता. नियमाप्रमाणे एक महिन्याचा कालावधी देणे आवश्यक आहे, असे देव यांनी निवेदनात म्हटले आहे. ज्येष्ठता यादी तयार करताना काही कर्मचार्‍यांवर अन्याय झाल्याची बाब कर्मचारी संघटनेने यापूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनात निवेदनाद्वारे आणून दिली होती. २९ फेब्रुवारी २0११ च्या शासन निर्णयानुसार, १४ मे १९९९ च्या आधी सवेत रुजू झालेले कर्मचारी विहीत संधीत व विशेष संधीत उत्तीर्ण न झाला तरीही त्याची ज्येष्ठता अबाधित राहील. त्यामुळे २४ मे १९९९ च्या आधी रुजू झालेल्या कर्मचार्‍यांना ज्येष्ठता डावलण्याचा नियम लागू होत नाही. सदर यादी तयार करताना काही कर्मचार्‍यांवर अन्याय झाल्याची शक्यता वर्तवित यादीबाबत चर्चेची मागणी कर्मचार्‍यांनी केली होती.

Web Title: CENTRAL CENTERS'S JESTALITY LIST TO BOOK TODAY!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.