वाल्मिक समाजाची शोभायात्रा
By Admin | Updated: September 4, 2014 22:57 IST2014-09-04T22:57:18+5:302014-09-04T22:57:18+5:30
मंगरूळपीर येथे वाल्मिक समाजाची शोभायात्रा;भाविकांचा उत्स्फुर्त सहभाग.

वाल्मिक समाजाची शोभायात्रा
मंगरूळपीर : वाल्मिक समाजाचे आराध्य दैवत रामदेवबाबा यांच्या भाद्रपद महिन्याच्या समाप्तीनिमित्त ४ सप्टेंबर रोजी शहरात शोभायात्रा काढण्यात येवून मंदिर परिसरात महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.
शहरातून रामदेव शोभायात्रा प्रथम वाल्मिकनगर, बिरबलनाथ मंदिर, सुभाष चौक, राजस्थानी चौक, कल्याणी चौकातून वाल्मिकनगर येथे विसजिर्त करण्यात आली. या प्रसंगी वाल्मिक समाजातील ज्येष्ठ नागरिक प्रभूदयाल सगत, कन्हैयाजी टांक, मुन्ना सिरसिया, प्रकाश बग्गण, मनोज चरावंडे, रमेश डागर, संजय खराटे, मोहन संगत, प्रकाश संगत, राजेश संगत, महेश संगत, संजय चरावंडे, गुरूचरण टांक, रवि सिरसिया, शाम टांक, दिलीप डांगर, प्रविण संगत तथा शहरातील सर्व वाल्मिक समाजातील पुरूष, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.