महाशिवरात्री उत्सव घरगुती पद्धतीने साजरा करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:41 IST2021-03-10T04:41:29+5:302021-03-10T04:41:29+5:30
वाशिम : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १५ मार्च २०२१ रोजीच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी ...

महाशिवरात्री उत्सव घरगुती पद्धतीने साजरा करा !
वाशिम : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १५ मार्च २०२१ रोजीच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ११ मार्च २०२१ रोजी होणारा महाशिवरात्री उत्सव वैयक्तिक स्वरुपात घरगुती पद्धतीने साजरा करावा तसेच यानिमित्ताने जेवणाचे कार्यक्रम आयोजित करून नयेत, असा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी ९ मार्च जारी केला.
या महाशिवरात्री उत्सवानिमित्त ११ मार्च रोजी जेवणाचे कार्यक्रम, यात्रा, मिरवणुका तसेच गर्दी होणारे इतर कोणत्याही प्रकारची कृती करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६०च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व योग्य ती कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.