गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:50 IST2021-09-08T04:50:09+5:302021-09-08T04:50:09+5:30
सर्वांच्या आवडत्या गणेशोत्सवाला येत्या चार दिवसांत सुरुवात होत आहे. कोरोनाची तिसरी संभाव्य लाट लक्षात घेता गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा ...

गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करा
सर्वांच्या आवडत्या गणेशोत्सवाला येत्या चार दिवसांत सुरुवात होत आहे. कोरोनाची तिसरी संभाव्य लाट लक्षात घेता गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. गणेश उत्सवानिमित्त शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये ७ सप्टेंबरला शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये बोलताना आगामी काळात साजरा होणारा गणेशोत्सव अतिशय साध्या प्रकारे साजरा करण्यात यावा. तसेच सार्वजनिक उत्सव साजरा करणे शक्यतो टाळावे. सार्वजनिक मूर्ती स्थापना करताना चार फुटांपेक्षा जास्त मोठी मूर्ती असू नये याची काळजी घ्यावी. लोकांना जबरदस्ती वर्गणी मागू नये, असे विविध आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक चव्हाण यांनी केले. यावेळी सुनील वानखडे, शशिकांत देशमुख, गजानन इरतकर यांचीसुद्धा भाषणे झाली. या बैठकीला उपसरपंच अस्लम परसुवाले, वीज वितरणचे अभियंता अर्जुन जाधव, संतोष आढागळे, गजानन देशमुख, सुलतान भाई, कैलास भालेराव, कपिल भालेराव, नंदकिशोर गोरे, नागेश भालेराव,गोलु भालेराव, यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.