कारंजावर कायमस्वरूपी सीसी कॅमे-यांची नजर!
By Admin | Updated: December 23, 2015 02:29 IST2015-12-23T02:29:01+5:302015-12-23T02:29:01+5:30
पोलीस अधीक्षकांनी केली घोषणा.

कारंजावर कायमस्वरूपी सीसी कॅमे-यांची नजर!
कारंजा (जि. वाशिम): कारंजा शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती गंभीर असल्यामुळे कायमस्वरूपी विविध चौक तसेच वर्दळीच्या ठिकाणी १0 सीसी कॅमेरे बसविण्यात येणार आहे. तसेच ईद-ए- मिलादुन्नबीनिमित्त शहरात ३0 सीसी कॅमेरे बसविण्यात आले असल्याची घोषणा मंगळवारी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी केली. स्थानिक शहर पोलीस स्टेशनमध्ये जिल्हा पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत होळकर म्हणाले, की राष्ट्रीय एकात्मता जोपासून सण साजरा करायला हवा. शांतता व सुवस्था अबाधित राहावी या उदेशाने मिरवणुकीदरम्यान मार्गावर ३0 ठिकाणी सी.सी. टीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. तसेच १0 लाख रुपय खर्च करून कायम स्वरूपी सीसीकॅमेरे लावण्यात येणार असल्याचाही ते म्हणाले . शांतता समितीच्या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, नायब तहसिलदार अमिता खंडारे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनाली गुल्हाने यांनी केले. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले, मौलाना अ. मजीद, काजी मो.इकबाल, डॉ.अजय कांत, डॉ. दिवाकर इंगोले, जाकिर शेख, मोहोड., दिलीप रोकडे यांच्यासह शांतता समितीच्या सदस्यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच उपस्थित सदस्यांनी सूचना ही मांडल्या. सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक राम सुरवसे तर आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक गजाननसिंग बायसठाकुर यांनी मानले. सभेला विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, शांतता समितीचे सदस्य, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.