गुरांचा बाजार बंद; बैलजोडी कुठे मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:43 IST2021-05-18T04:43:18+5:302021-05-18T04:43:18+5:30
शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानुषंगाने शेती मशागतीची कामे जोरात सुरू आहेत. ...

गुरांचा बाजार बंद; बैलजोडी कुठे मिळणार?
शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानुषंगाने शेती मशागतीची कामे जोरात सुरू आहेत. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आजही ट्रॅक्टरऐवजी बैलजोडीने पेरणी करण्यास प्राधान्य देतात. मात्र, सध्या कोरोनाच्या संकटामुळे ग्रामीण भागातील गुरे खरेदी-विक्रीचे बाजार बंद आहेत. त्यामुळे ज्यांना बैलजोडीची खरेदी व विक्री करायची आहेत, त्यांच्यासमोर बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.
...........
बाॅक्स :
ट्रॅक्टर मशागतीला मागणी वाढली
सध्या कोरोनाची दुसरी लाट आल्याने सर्व काही बंद असल्यामुळे व काही दिवसांवर खरीप हंगाम आल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे ट्रॅक्टरद्वारे करून घ्यावी लागत आहेत. यामुळे ट्रॅक्टरची मागणी अचानक वाढली आहे.
.............
शेती मशागतीच्या कामाकरिता बैलजोडी असणे आवश्यक आहे; परंतु कोरोनामुळे गुरे खरेदी-विक्रीचा बाजार बंद असल्याने बैलजोडी मिळणे अशक्य झाले आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
- डिगांबर चोपडे,
शेतकरी, भर जहागीर