गुरांमधील संसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमास मंजूरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 04:59 PM2020-07-03T16:59:18+5:302020-07-03T17:00:02+5:30

अंमलबजावणीसाठी राज्यासह जिल्हा आणि तालुकास्तरीय समिती गठित करण्यात आल्या आहेत.

Cattle Infectious Disease Control Program Approved! | गुरांमधील संसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमास मंजूरी!

गुरांमधील संसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमास मंजूरी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : एरव्ही दरवर्षी मे महिन्याच्या सुरूवातीला राबविल्या जाणाऱ्या गुरांमधील संसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमास कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे यंदा विलंब झाला. दरम्यान, शासनाने २ जून रोजी त्यास मंजूरी दिली असून, अंमलबजावणीसाठी राज्यासह जिल्हा आणि तालुकास्तरीय समिती गठित करण्यात आल्या आहेत.
गुरांमधील संसर्गजन्य लाळ-खुरकुत आणि सांसर्गिक गर्भपात रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यातील गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आणि वराहांना सहा महिन्याच्या अंतराने वर्षातून दोनवेळा तसेच ४ ते ८ महिने वयोगटातील गायींच्या कालवडी व म्हशींच्या पारड्यांना एकवेळा सांसर्गिक गर्भपात प्रतिबंधक लसीकरण केले जाते. त्यानुसार, २०१९-२० या वर्षातील कार्यक्रम ‘लॉकडाऊन’मुळे काहीअंशी लांबणीवर पडला. आता त्यास मंजूरी मिळाली असून अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय; तर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानुषंगाने नियोजन आखण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
 
गुरांमधील संसर्गजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमासंबंधीचे शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार, ३ जून रोजी यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाºयांची तातडीची बैठक घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या. लाळ-खुरकुत आणि सांसर्गिक गर्भपात रोग नियंत्रणासाठी लागणाºया लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
- भुवनेश बोरकर
सहायक उपायुक्त, जिल्हा पशूसंवर्धन विभाग, वाशिम

Web Title: Cattle Infectious Disease Control Program Approved!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम