भरारी पथकाच्या ग्रामीण भागातील कार्यालयांना आकस्मिक भेटी

By Admin | Updated: October 24, 2016 17:34 IST2016-10-24T17:34:16+5:302016-10-24T17:34:16+5:30

जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांच्या पथकाने ग्रामीण भागातील शासकीय कार्यालयांना आकस्मिक भेटी देण्याची मोहिम हाती घेतली आहे.

Casual Gifts to the Rural Area Offices | भरारी पथकाच्या ग्रामीण भागातील कार्यालयांना आकस्मिक भेटी

भरारी पथकाच्या ग्रामीण भागातील कार्यालयांना आकस्मिक भेटी

>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 24 - जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांच्या पथकाने ग्रामीण भागातील शासकीय कार्यालयांना आकस्मिक भेटी देण्याची मोहिम हाती घेतली आहे. यामुळे शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशू दवाखाने, ग्रामपंचायत आदी कार्यालयांचे कर्मचारी सतर्क झाल्याचे दिसून येते.
ग्रामीण व तालुकास्तरीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांची दैनंदिन उपस्थिती तपासणे, दांडीबाज अधिकारी-कर्मचाºयांवर नियंत्रण मिळविणे, कामकाजात गतिमानता आणणे, नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत भरारी पथकांनी ग्रामीण व तालुकास्तरीय कार्यालयांना आकस्मिक भेटी देण्याचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्यांनी उपस्थित केला होता. त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी प्रत्येक विभाग प्रमुखांचे भरारी पथक तयार केले. या भरारी पथकाने महिन्यातून किमान दोन कार्यालयांना भेटी देणे बंधनकारक केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २४ आॅक्टोबरपासून सुरू झाली. दिवाळीच्या सुट्ट्यानंतर एक भरारी पथक १५ दिवसांतून एकदा ग्रामीण भागातील शासकीय कार्यालयांना आकस्मिक भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करणार आहे. याचा अहवाल थेट मुख्य कार्यकारी अधिकाºयांना सादर केला जाणार आहे.                        

Web Title: Casual Gifts to the Rural Area Offices