जातीपातीचे राजकारण आले रंगात

By Admin | Updated: October 10, 2014 00:54 IST2014-10-10T00:48:54+5:302014-10-10T00:54:07+5:30

वाशिम जिल्ह्यातील प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पोटजातही झाली प्रतिष्ठेची.

Caste politics came in color | जातीपातीचे राजकारण आले रंगात

जातीपातीचे राजकारण आले रंगात

वाशिम - आघाडी आणि युतीमध्ये झालेल्या फाटाफुटीने, तीनही विधानसभा मतदारसंघात विजयाचे समीकरण बिघडविले आहे. परिणामी, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जातीपातीचे भावनिक आवाहन करून पोटजातीच्या मुद्यालाही हात घातला जात असल्याने निवडणुकीचे चित्र अधिकच अस्पष्ट झाले आहे.
प्रमुख पक्षांनी ह्यएकला चलो रेह्णचा नारा दिल्याने जिल्ह्यातील रिसोड, वाशिम व कारंजा या तीन म तदारसंघात प्रमुख पक्षांसह अपक्ष असे एकूण ५७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यापैकी २९ अपक्ष तर २८ उमेदवार पक्षाच्या चिन्हावर नशिब आजमावत आहेत. राज्यात सर्वत्र निवडणुकीचा माहौल रंगात आलेला असताना, वाशिम जिल्ह्यात कारंजाचा अपवाद वगळता उर्वरि त दोनही विधानसभा मतदारसंघातील गारवा अजूनही कायमच असल्याचे दिसून येते.
कारंजात निवडणुकीच्या व्यासपीठावरून नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगत आहे. युती, आघाडी तुटल्यामुळे सख्खे शेजारी पक्के वैरी झाल्याचे दिसून येत आहे. कारंजा मतदारसंघाच्या इतिहासावर नजर टाकली तर कोणत्याही एकाच जातीच्या उमेदवाराला मतदारांनी वारंवार कौल दिला नसल्याचे दिसून येते. २0१४ च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरला आहे; परंतु मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कुणाकडेही ठोस मुद्दे नसल्याने शेवटी जाती-पातीच्या मुद्याभोवती राजकारण फिरत असल्याचे दिसून येत आहे. समाजाच्या होणार्‍या गुप्त बैठकांवरूनही तेच स्पष्ट होत आहे. प्रचाराच्या दुसर्‍या टप्प्यापर्यंत जाती-पोटजातीचा मुद्दा फारसा प्रतिष्ठेचा नव्हता; मात्र मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसा जात-पोटजातीच्या मुद्याला हात घातला जात असल्याचे राजकीय वतरुळातील चर्चेवरून दिसून येत आहे. कारंजा मतदारसंघात मराठा समाजा तील सुभाष ठाकरे, प्रकाश डहाके, डॉ. सुधीर कव्हर, ज्योती गणेशपुरे , जैन समाजातील राजेंद्र पाटणी तर मुस्लिम समाजातील युसूफ पुंजानी हे प्रबळ उमेदवार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. पक्षाच्या एकगठ्ठा मतदानाबरोबरच जात आणि पोटजातीचे मतदानही पदरात पाडून घेण्यासाठी आता समाजाच्या गुप्त बैठकांचे सत्रही सुरू झाल्याचे राजकीय चर्चेतून समोर येत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कमकुवत आणि प्रबळ उमेदवाराचा अंदाज आल्यानंतर नातेसंबंध, पोटजात व पक्ष बाजूला सारून जातीच्या प्रबळ उमेदवारालाच पसंती देण्यापर्यंतची फिल्डिंगही समाजाच्या या गुप्त बैठकांमधूनच लावली जात असल्याची माहिती चर्चेतून समोर येत आहे.
प्रत्येकजण स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जात असल्याने पक्षाबरोबरच जात-पोटजात हा फॅक्टरही प्रतिष्ठेचा बनला असल्याचे दिसून येते. मराठा समाजाचे मतदान चार उमेदवारात विभागले जाण्याची बाब सेनेच्या पथ्यावर पडणारी आहे. नेमकी हीच बाब हेरून प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जात-पोटजातीच्या मुद्याला हात घातला जात असल्याने निवडणुकीला जातीपातीचा रंग चढत असल्याने निकाल कसे लागतील, याचा अंदाज बांधणे अवघड झाले आहे.

Web Title: Caste politics came in color

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.