शहरं
Join us  
Trending Stories
1
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
2
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
5
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
6
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
7
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
8
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
9
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
10
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
11
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
12
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
13
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
14
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
15
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
16
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
17
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
18
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
19
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
Daily Top 2Weekly Top 5

हाणामारीप्रकरणी गुन्हे दाखल

By admin | Updated: April 6, 2015 01:54 IST

गवळीपु-यातील दोन गटात हाणामारी प्रकारण.

वाशिम : हनुमान जयंतीच्या निमित्ताने आरती का करीत आहात, या कारणावरून गवळीपुर्‍यात दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये ४ एप्रिल रोजी रात्री उशिरा परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. शहरातील गवळीपुरा परिसरात एका पिंपळाच्या झाडाखाली हनुमानाची प्रतीकात्मक मूर्ती बर्‍याच दिवसांपासून आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने या मूर्तीजवळ आरतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. आरती आटोपल्यानंतर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम सुरू असताना २0 ते २५ लोक जमा होऊन त्यांनी या ठिकाणी आरती का करता असे कारण समोर करून हाणामारी केल्याची तक्रार विजय रनशिंगे याने वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली. या तक्रारीहून पोलिसांनी दादू उदीवाले, मेहबुब उदीवाले, छोट्या उदीवाले, हिरा बेनिवाले, सद्दाम मांजरे, मोईल अन्वर व ईतर २0 ते २५ इसमांविरुद्ध भादंविचे कलम १४७, १४८, १४९, ३२३, ५0६, ४२७, ४ (२५) आर्म अँक्ट व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकीणी अँट्रॉसिटी अँक्टचा गुन्हा दाखल करून हिरा बेनिवाले व दादू उदीवाले यांना अटक केली. या दोघांना न्यायालयाने ६ एप्रिल पर्यंंत पोलीस कोठडी सुनावली. हिरा बेनीवाले यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले की रनशिंगे याने तलवारीने मारण्याचा प्रयत्न केला असता दादू उदीवाले याने तलवार हातात पकडली. पोलिसांनी विजय रनशिंगे याच्याविरुद्ध ३२३, ४ (२५) आर्म अँक्ट अन्वये गुन्हा दाखल केला.