हाणामारीप्रकरणी गुन्हे दाखल
By Admin | Updated: April 6, 2015 01:54 IST2015-04-06T01:54:09+5:302015-04-06T01:54:09+5:30
गवळीपु-यातील दोन गटात हाणामारी प्रकारण.

हाणामारीप्रकरणी गुन्हे दाखल
वाशिम : हनुमान जयंतीच्या निमित्ताने आरती का करीत आहात, या कारणावरून गवळीपुर्यात दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये ४ एप्रिल रोजी रात्री उशिरा परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
शहरातील गवळीपुरा परिसरात एका पिंपळाच्या झाडाखाली हनुमानाची प्रतीकात्मक मूर्ती बर्याच दिवसांपासून आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने या मूर्तीजवळ आरतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. आरती आटोपल्यानंतर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम सुरू असताना २0 ते २५ लोक जमा होऊन त्यांनी या ठिकाणी आरती का करता असे कारण समोर करून हाणामारी केल्याची तक्रार विजय रनशिंगे याने वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली.
या तक्रारीहून पोलिसांनी दादू उदीवाले, मेहबुब उदीवाले, छोट्या उदीवाले, हिरा बेनिवाले, सद्दाम मांजरे, मोईल अन्वर व ईतर २0 ते २५ इसमांविरुद्ध भादंविचे कलम १४७, १४८, १४९, ३२३, ५0६, ४२७, ४ (२५) आर्म अँक्ट व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकीणी अँट्रॉसिटी अँक्टचा गुन्हा दाखल करून हिरा बेनिवाले व दादू उदीवाले यांना अटक केली. या दोघांना न्यायालयाने ६ एप्रिल पर्यंंत पोलीस कोठडी सुनावली.
हिरा बेनीवाले यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले की रनशिंगे याने तलवारीने मारण्याचा प्रयत्न केला असता दादू उदीवाले याने तलवार हातात पकडली. पोलिसांनी विजय रनशिंगे याच्याविरुद्ध ३२३, ४ (२५) आर्म अँक्ट अन्वये गुन्हा दाखल केला.