अवैध सावकारीप्रकरणी घरावर धाड; आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त!
By Admin | Updated: April 21, 2017 01:11 IST2017-04-21T01:11:05+5:302017-04-21T01:11:05+5:30
मालेगाव : सावकारी कायद्यांतर्गत वरदरी बु. येथील नामदेव नथ्थू आडे व अनसूयाबाई नथ्थू आडे यांच्या घरावर सहायक निबंधकांच्या पथकाने १८ एप्रिल रोजी अचानक धाड टाकून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली.

अवैध सावकारीप्रकरणी घरावर धाड; आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त!
मालेगाव : सावकारी कायद्यांतर्गत वरदरी बु. येथील नामदेव नथ्थू आडे व अनसूयाबाई नथ्थू आडे यांच्या घरावर सहायक निबंधकांच्या पथकाने १८ एप्रिल रोजी अचानक धाड टाकून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली.
याप्रकरणी सहायक निबंधक सहकारी संस्था, मालेगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष कनिराम आडे यांनी नामदेव आडे आणि अनसूयाबाई आडे यांच्याविरुद्ध अवैध सावकारीची तक्रार दिली होती. त्यानुसार, सहायक निबंधक पी.टी. सरकटे, सहायक सहकार अधिकारी एस.बी. रोडगे, कनिष्ठ लिपिक बी.ए इंगळे, पोलीस कर्मचारी संजय पिंपळकर, गजानन नवलकर, जया खराटे आदींच्या पथकाने नामदेव आडे व अनसूयाबाई आडे यांच्या घरावर अचानक धाड टाकली. यावेळी चौकशी केली असता, आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आल्याची माहिती सहायक निबंधकांनी दिली.