भरधाव वाहनाची विजेच्या खांबाला धडक

By Admin | Updated: March 28, 2015 01:55 IST2015-03-28T01:55:41+5:302015-03-28T01:55:41+5:30

वीज वितरण कंपनीचे ३0 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार.

The carriage of the flying carrier hits the electric poles | भरधाव वाहनाची विजेच्या खांबाला धडक

भरधाव वाहनाची विजेच्या खांबाला धडक

मंगरुळपीर (जि. वाशिम): भरधाव चारचाकी गाडीने वीज कंपनीच्या खांबांना धडक दिल्याने यामध्ये वीज वितरण कंपनीचे ३0 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार पोलिसात दिल्याने पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विनायक रामचंद्र जामकर सहायक अभियंता वीज वितरण कंपनी मंगरुळपीर यांनी २७ रोजी पोलिसात तक्रार दिली की, चारचाकी गाडी क्र.एम.एच.0६, ए.टी. १४१४ च्या चालकाने २६ रोजी रात्री ८ वाजता त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून वीज वितरण कंपनीच्या दोन खांबांना धडक दिली. यामध्ये पोल, तार व इतर साहित्याचे एकूण ३0 हजार रुपयांचे नुकसान केले. अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम २७९, ४२७, भादंवि १८४, एम.य.अँक्ट व कलम १३९ भारतीय विद्युत कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The carriage of the flying carrier hits the electric poles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.