काेरोनामुळे ग्रामीण भागातील विकासाला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:41 IST2021-05-26T04:41:01+5:302021-05-26T04:41:01+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावस्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतीला सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय गावात ...

काेरोनामुळे ग्रामीण भागातील विकासाला ब्रेक
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावस्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतीला सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय गावात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास सदर रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीची चाचणी करणे, गावातील शाळांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करणे, निर्जंतुकीकरण फवारणी, कोरोना आजाराबाबत जनजागृती, लसीकरण मोहिमेला प्रतिसाद मिळावा यासाठी पात्र व्यक्तींना प्रेरित करणे, परठिकाणाहून येणाऱ्यास विलगीकरणात पाठविणे अशा विविध उपाययोजना पथकामार्फत केल्या जात आहेत. या पथकामध्ये सरपंच, उपसरपंच यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे मुख्य पदाधिकारी कोरोना उपाययोजना करण्यासाठी झटत असल्याने इतर विकासकामांना ब्रेक लागत असल्याचे चित्र गावोगावी दिसून येत आहे. १५ व्या वित्त आयोगाचा निधीही ग्रामपंचायतींना लवकर मिळत नसल्याने विकासकामांवर परिणाम होत आहे. तसेच विविध योजनांतील निधी ग्रामपंचायतींना मिळत नसल्याने गाव विकासावर परिणाम होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे गावातील विकासही खुंटला असल्याचे दिसून येत आहे.