गाडगेबाबा नगरमध्ये काेराेना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:38 IST2021-04-03T04:38:21+5:302021-04-03T04:38:21+5:30
यावेळी माजी नगराध्यक्ष रेखा अरुण बळीव सामाजिक कार्यकर्ते अरुण बळी यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण कॅम्पला सुरुवात करण्यात आली. ...

गाडगेबाबा नगरमध्ये काेराेना लसीकरण
यावेळी माजी नगराध्यक्ष रेखा अरुण बळीव सामाजिक कार्यकर्ते अरुण बळी यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण कॅम्पला सुरुवात करण्यात आली. सकाळी ११ ते १२ या एक तासात ५२ महिलांनी लसीकरण करून घेतले. लसीकरण करण्यासाठी डॉक्टर वृषाली राणे, आरोग्य सेवक एस. एल. घुले, नगरपंचायतचे कर्मचारी महादेव राऊत, बाळू गवई, विठ्ठल चोपडे यांनी सहकार्य केले. तसेच गाडगेबाबानगरमधील ज्येष्ठ नागरिक प्रा. पी. एस. खिराडे, महेंद्र उंबरकर, विलासराव मुंढे, रामभाऊ चाफे, संतोष भालेराव, प्रा. किसन राठोड यांनी शिबिरात ४५ वर्षाच्यावरील महिला व पुरुषांनी लसीकरण करून घेण्यासाठी सहकार्य केले. तसेच गाडगेबाबा मंडळाचे युवक व ओंकारगीर बाबा मंडळाचे सेवेकरी यांनी शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले.