मालवाहू वाहन उलटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:46 IST2021-08-21T04:46:48+5:302021-08-21T04:46:48+5:30
----------- पथदिव्यांअभावी ग्रामस्थांना अडचणी वाशिम : निम्मा पावसाळा उलटला तरी ग्रामीण भागातील अनेक गावांत बंद असलेले पथदिवे सुरू करण्याबाबत ...

मालवाहू वाहन उलटले
-----------
पथदिव्यांअभावी ग्रामस्थांना अडचणी
वाशिम : निम्मा पावसाळा उलटला तरी ग्रामीण भागातील अनेक गावांत बंद असलेले पथदिवे सुरू करण्याबाबत ग्रामपंचायती उदासीन असून, पथदिवे बंद असल्याने ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
------------------
वन्यप्राणी करताहेत पिके फस्त
वाशिम : खरीप हंगामातील पिके आता चांगलीच बहरली आहेत; परंतु आता वन्यप्राणी या पिकांवर ताव मारत आहेत. यात हरीण आणि रोहींचे कळप शेकडो एकर क्षेत्रातील शिवारात धुडगूस घालून सोयाबीन, मूग, उडदाची पिके फस्त करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
------------------
‘रोहयो’च्या कामांची तयारी
वाशिम : जिल्ह्यात तीन लाखांहून अधिक जॉबकार्ड धारक मजूर आहेत. या कामगारांसाठी रोहयोची कामे सुरू करण्याची तयारी रोहयो विभागाने केली आहे. यासाठी रोहयो विभागाकडून ग्रामपंचायतींच्या माध्यमातून कामाची मागणी नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
---------
शेतकऱ्यांची वहिवाट बंद
वाशिम : तालुक्यातील विविध गावांतील शेतशिवारात पाणंद रस्त्यांची अवस्था वाईट बनली आहे. अपुऱ्या निधीमुळे या रस्त्यांची कामे सुरू होऊ शकली नाहीत. आता या रस्त्यांवर चिखल झाल्याने शेतकऱ्यांची वहिवाट बंद पडली आहे.
--------------
झुकलेल्या खांबामुळे अपघाताची शक्यता
वाशिम : तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांना वीज जोडणीसाठी उभारलेले वीज खांब पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झुकले आहेत. एखादवेळी खांब कोसळल्यास अपघाताची भीती असल्याने हे खांब सरळ करण्याची मागणी होत आहे.
------------------