कारंजा पोलिसांचा गावठी दारू भट्टय़ांवर छापा

By Admin | Updated: September 13, 2014 23:02 IST2014-09-13T23:02:18+5:302014-09-13T23:02:18+5:30

कारंजा तालुक्यात पोहा, लाहोरा येथे गावठी दारूभट्यांवर छापा टाकुन दोघांना अटक केली आहे.

Caranza police station raid on liquor fritters | कारंजा पोलिसांचा गावठी दारू भट्टय़ांवर छापा

कारंजा पोलिसांचा गावठी दारू भट्टय़ांवर छापा

कारंजा लाड: तालुक्यातील पोहा आणि लोहारा येथे कारंजा पोलिसांनी १३ सप्टेंबर रोजी गावठी दारूच्या अवैध भट्टींवर छापा टाकून दोन आरोपीेंना अटक करीत दारूसह इतर साहित्य मिळून अंदाजे अकराशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारंजा तालुक्यातीलच लोहारा येथे बिट जमादार नंदकु मार सरनाईक यांच्या नेतृत्वात कारंजा पोलिसांनी गावठी दारूच्या अवैध भट्टीवर छापा टाकून दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा अंदाजे २0 लीटर मोह सडवा जप्त क रीत आरोपी वासुदेव भिमराव राठोड याला अटक केली. दुसर्‍या एका घटनेत पोहा येथे पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून कारंजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक केशव राठोड, कैलास जाधव आदि पोलिस कर्मचार्‍यांनी शनिवार १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गावठी दारूच्या अवैध भट्टीवर छापा टाकून अंदाजे ३00 रुपये किमतीची ५ लीटर गावठी दारू दारू, तसेच इतर साहित्य जप्त करून आरोपी प्रमोद शालिग्राम राठोड याला अटक केली.

Web Title: Caranza police station raid on liquor fritters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.