कारंजा नगर परिषदेचे वाचनालय वार्यावर
By Admin | Updated: August 20, 2014 22:56 IST2014-08-20T22:56:10+5:302014-08-20T22:56:10+5:30
शासकीय कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहणाने नागरिकांना त्रास सहन करावा लागत

कारंजा नगर परिषदेचे वाचनालय वार्यावर
कारंजालाड: ऐतिहासिकदृष्ट्या वैभवसंपन्न म्हणून ओळखल्या जाणार्या कारंजा शहरातील अनेक शासकीय कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहणाने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असतांनाच शहरातील नगर परिषदेच्या वाचनालयाचे ग्रथंपाल पद मागील एक वर्षापासून रिक्त असल्यामुळे वाचणालय वार्यावर असल्याचे दिसत आहे.
वाचनाने माणूस प्रगल्भ व समुध्द होतो म्हणून मागील २५ वर्षापासून नियमितपणे वाचनालय सुरु असून त्याचे वाचक सुध्दा या वाचनालयाचा नियमित उपयोग करतात. अ दर्जा प्राप्त झालेल्या या वाचनालयात शहरातील व ग्रामीण भागातील दररोज ३0 ते ४0 युवक सकाळी व सांयकाळी नगर परीषदेच्या वाचनालयाचा उपयोग घेतात. मात्र लोकप्रतिनिधी व नगर परीषद प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे येथील ग्रंथपालाचे पद रिक्त आहे. येथील महिला कर्मचार्यांला येथील सर्व काम करावे लागत आहे. त्यामुळे त्या कर्मचार्यावर ताण येतो. ग्रंथपालाचे पद रिक्त असल्याने वाचनालयातील नवीन पुस्तकांची खरेदी थांबलेली आहे. यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना वाचनापासून वंचित राहावे लागत आहे.
नवनवीन स्पर्धा परीक्षेचे आव्हाने विद्यार्थ्यांसमोर उभे ठाकले असताना विद्यार्थ्यांना लागणारे वेगवेगळ्या विषयाची पुस्तके मिळत नाही.
त्यामुळे युवकांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे. येथील वाचालयाचे ग्रंथपाल पद त्वरीत भरण्यात या समस्याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी वाचकाकडून होत आहे.